स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 4
चमत्कार
वडनेर (भुजंग)
सर्पद्वय पतन स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अवस्थान स्थान देवळाच्या ईशान्येस अंजनगावकाकडा सडकेच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात; देवळाच्या सभामंडपातील स्थान मांडलिक आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ संध्याकाळच्या वेळेस काकड्याहून वडनेरला आले. ते वटेश्वराच्या देवळात झोपण्यासाठी जात होते. त्या वेळी पुजारी देवतेस धुपारती करून परत निघाला होता. तो सर्वज्ञांना म्हणाला, "या देवळात पूजेची भांडी वगैरे आहेत, ती चोरीस जाऊ नयेत म्हणून देवळास कुलूप घातले आहे, तरी तुम्ही पलीकडच्या उत्तरेश्वराच्या देवळात झोपण्यासाठी जा." मग सर्वज्ञ येथे आले. त्यांच्या वेळी येथे उत्तरेश्वराचे देऊळ होते. या ठिकाणी त्यांनी पहुड स्वीकारला. येथील देवळात दोन महाभयंकर भुजंग साप राहत होते. ते रात्री एकमेकांशी भांडत भांडत सर्वज्ञांच्या छातीवर येऊन पडले. तेव्हा त्यांनी दोन्ही श्रीकरांनी दोन्हीही साप बाजूला फेकून दिले. ही घटना सकाळी पुजाऱ्यास कळाली, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. (पू. ली. ८० व ८१; स्था. पो.)