स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 1
क्रीडा
काकडा
पोतकी खेळ करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वडनेरहून किंचित ईशान्येस ३ किमी; परतवाडा ते काकडा ( पथ्रोट, सिंधी मार्गे) ३५ किमी; असदपूर ते काकडा ९ किमी; एस.टी. बस बस सेवा उपलब्ध आहे .
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान काकडा गावाच्या उत्तरेस १ किमी अंतरावर सडकेच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
पूर्वी या ठिकाणी तळे होते. खुबटा, सिंधी, बोपजय, आंबजय, वडनेर, काकडा या गावांचे गोपाल, गाई पाणी पाजण्यासाठी येथे घेऊन येत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात अचलपूरहून येथे आले. त्यांनी आपल्या जवळचे वस्त्र फाडून त्याचे लहान लहान तुकडे तयार केले. गोपालांना चिंचोक्याच्या आसु व दामोटीचे दाम करण्यास सांगितले. मग सर्वज्ञांनी गोपालांच्या सोबत लुटुपटीचा दुकानदारीचा खेळ केला. (पू. ली. ७८; स्था. पो.)