स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 5
चरणांकित
अचलपूर
चरणचारी उभे राहणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बोरबनातील स्थानापासून नैऋत्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर रेल्वे पुलाच्या पूर्वेस शेतात सर्पीण नदीच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. (सर्वज्ञांच्या वेळी येथे निर्वाणीचे देऊळ होते)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवस सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भांडारेकारांसह येथे आले. देवळाच्या चौकात उभे राहिले आणि भांडारेकारांना म्हणाले, "तुम्ही या देवळात बसा. आम्ही पलीकडच्या देवळात जात आहेत. येथे कुणी येईल, तुम्हाला काही म्हणेल, ते तुम्ही करा." असे सांगून सर्वज्ञ निर्वाणीच्या देवळामागील भैरवाच्या देवळात गेले. मग येथे पाचौळीची राणी धानाबाई देवता दर्शनास आली. नीट भांडारेकारांना पाहिले व विनंती करून आपल्या आवारी नेले. (पू. ली. ४८; स्था. पो.)