स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 6
वास्तव्य
अचलपूर
कुडी वसती स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चरणचारी उभे राहणे स्थानापासून वायव्येस अंदाजे ८०४ मीटर अंतरावर सर्पीण नदीच्या पश्चिम काठी श्री. बायाजी किसनजी भोंडे यांच्या संत्र्याच्या बागेमध्ये देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
रामदराणा राजाची भाव श्रद्धा कमी झाल्यामुळे एके दिवशी सर्वज्ञ उदास होऊन सर्व राज्यधर्माचा त्याग करून पासवडीचे वस्त्र परिधान करून येथे आले. सर्वज्ञांच्या वेळी येथे सोमनाथाचे देऊळ होते. त्यांचे या ठिकाणी दोन दिवस दोन रात्र वास्तव्य होते. रामदराणा राजा सर्वज्ञांसाठी भोजनाचे ताट येथेच घेऊन येत असे. मग तिसऱ्या दिवशी त्यांच्या विनंतीवरून सर्वज्ञ नगरामध्ये गेले. (पू. ली. ७७; स्था. पो.)