मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

देऊरवाडा · चांदूरबाजार · अमरावती

स्थान - T:चांदूरबाजार D:अमरावती

स्थान क्र. 1 वास्तव्य/आसन देऊरवाडा

वस्ती स्थान आणि आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कुऱ्हाहून ईशान्येस देऊरवाडा ८ कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे. १) चांदूरबाजारहून माधान मार्गे देउरवाड्यास जाण्यास सडक आहे. चांदूरबाजार ते देऊरवाडा ११ कि. मी. आहे. २) परतवाड्याहून (कोठारा, खरपी, करजगाव, शिरजगाव कसबा मार्गे) देऊरवाड्यास जाण्यास सडक आहे. ३) कुऱ्हाहून शिरजगाव कसबा मार्गे देउरवाड्यास जाता येते. देऊरवाडा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देऊरवाड्याच्या पश्चिमेस पूर्णा-मेघा संगमाजवळ मेघा नदीच्या पश्चिम काठी पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: चांदूरबाजार | Distt: अमरावती
उभय अवतारांचा संबंध. १) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भडोचच्या राजवैभवाचा त्याग करून रिद्धपूरकडे जाताना देउरवाड्याला आले. त्यांच्या सोबत हडपीया व सागळीया हे दोनच सेवक राहिले होते. त्यांचा येथे एक रात्र मुक्काम झाला. रात्री दोघे दोहीकडे आणि मध्यभागी सर्वज्ञ, असे झोपले होते. ते दोघे झोपेत असताना सर्वज्ञांनी सर्व अलंकारांचा त्याग करून एक वस्त्र नेसून व एक वस्त्र पांघरून रिद्धपूरकडे प्रयाण केले. (पू. ली. २०, स्था. पो.) २) रामदरणा राजा सर्वज्ञांना अचलपूरला घेऊन जात होता. त्या वेळी सर्वज्ञांना येथे थोडा वेळ आसन झाले. (ए. ली. ६१, ख.प्र.) ३) श्रीप्रभूंचे प्रतिमदी अवस्थान असताना ते येथे विहरणासाठीही येत असत. (स्था. पो. उ. प्र.)

जवळील इतर स्थाने