स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 221
चमत्कार
कोळविहीर
काटा श्रीकरो मोडणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आष्टोलीहून किंचित आग्नेयेस कोळविहीर पायमार्गे ३ कि. मी. आहे. कोळविहीर हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावर रिद्धपूरहून किंचित ईशान्येस ५ कि. मी. आहे व मोर्शीहून नैऋत्येस २० कि. मी. आहे. डोमक ते कोळविहीर (तरोडा मार्गे) ५ कि. मी. आहे. कोळविहीरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कोळविहीर गावाच्या आग्नेय विभागी परतवाडा-मोर्शी मार्गाच्या दक्षिणेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
एक दिवस रिद्धपूरला राजमठामध्ये श्रीगोविंदप्रभूंना आरोगण्यासाठी ताट वाढले. गोविंदप्रभू आरोगणा करण्याकरिता बसले; परंतु लगेच तसेच ताटावरून उठून कोळविहीरकडे चरणचारी धावत आले. पाठीमागून भक्तजनही धावत आले. येथे बाभळीचे झाड होते. तिचा काटा त्यांनी आपल्या श्रीकराने मोडून टाकला. मग रिद्धपूराकडे परतले. (गो. प्र. च. १००, स्था. पो.)