स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 3
पूजा/भोजन
सालबर्डी
मुक्ताबाईच्या गुंफेतील पूजा आरोगणा स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मौन्यदेव स्थानापासून ईशान्येस ६०० मीटर अंतरावर गंगा नदीच्या पूर्व काठी पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
मुक्ताबाईने येथे सर्वज्ञांची वनपुष्पांनी पूजा केली. दंडवत घातले. नंतर हात जोडून मुक्ताबाई म्हणाली, "अनेक वर्षे तप केले, त्याचे फळ आज मिळाले." मग तिने सर्वज्ञांना कंदमूळ फळांची आरोगणा दिली. (पू. ली. २३) बोल्हा बारीयाला येथेच सर्वज्ञांकडून स्थिती झाली. (ए. ली. ११ ख. प्र.)