स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 1
पालखी/आसन
काटपूर
दांडी खालाविणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शिरखेडहून पश्चिमेस काटपूर पायमार्गे ३ कि. मी. आहे. काटपूर हे गाव, परतवाडा-तिवसा मार्गावर लेहेगावापासून किंचित वायव्येस ४ कि. मी. आहे व रिद्धपूरहून आग्नेयेस १२ कि. मी. आहे. काटपूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान काटपूर गावाच्या उत्तर विभागी पूर्वाभिमुख देवळात (मुख्य प्रवेशद्वार व देवळाच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख) आहे. हे देऊळ ' श्रीदत्त मंदिर ' या नावाने ओळखले जाते
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू शिरखेडहून रिद्धपूरला जाताना काटपूरला आले. येथे पालखी थांबविली. मग त्यांना या ठिकाणी आसन झाले. (भी. प्र. ली. २८८, स्था. पो.)