स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 1
वास्तव्य
आखतवाडा
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आखतवाडा हे गाव, परतवाडा-तिवसा मार्गावरील नेर (पिंगळाई) गावापासून दीड कि. मी. आहे. १) काटपूर ते नेर ८ कि. मी. २) लेहेगाव ते नेर ४ कि. मी. ३) तिवसा ते नेर २१ कि. मी. ४) काटपूर ते आखतवाडा पायमार्गे ८ कि. मी. नेरपर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. आखतवाडा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आखतवाडा गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. (श्रीप्रभूच्या वेळी येथे भोप्याचा आवार होता)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू नमस्कारीहून आखतवाड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून शिरखेडला गेले. (गो. प्र. च. २४३, स्था. पो.)