स्थान - T:तिवसा D:अमरावती
स्थान क्र. 1
पालखी/आसन
तिवसा
दांडी खालाविणे स्थान (श्रीप्रभू चरणांकित)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
तिवसा हे गाव, मुंबई - कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीहून ईशान्येस ४१ कि. मी. आहे; व नागपूरहून पश्चिमेस १११ कि. मी. आहे. नेर-पिंगळाईहून आग्नेयेस तिवसा २१ कि. मी. आहे. आखतवाड्याहून तिवसा (नेर, धानोरा, तळेगाव मार्ग) १५ कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिवसा गावाच्या पश्चिमेस पिंगळाई नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे . देवळाच्या नैऋत्य कोपऱ्यातले स्थान व दांडी खालाविणे स्थानाच्या उत्तरचे स्थान हे दोन्ही स्थाने मांडलिक आहेत.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू शेंदूरजनाबाजारहून तिवसाला आले. येथे पालखी थांबविली. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा ( चुळ भरणे )-विडा झाला. मग ते येथून भिष्णूरला गेले. (क्र. प्र. ली. २३०, स्था. पो.)