मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नमस्कारी · तिवसा · अमरावती

स्थान - T:तिवसा D:अमरावती

स्थान क्र. 1 अवस्थान/भोजन नमस्कारी

श्रीगोविंदप्रभूंचे अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नमस्कारी हे गाव, भिष्णूरहून उत्तरेस ३ कि. मी. अंतरावर वर्धा नदीच्या पश्चिम काठावर आहे. भिष्णूरहून भारसवाडा मार्गे नमस्कारीला जाता येते. भिष्णूर ते भारसवाडा ४ कि. मी. आहे. भारसवाड्यापर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तिवसा ते नमस्कारी (मार्गे मददापूर) १० कि. मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नमस्कारी गावाच्या उत्तरेस मराठी शाळेजवळ पूर्वाभिमुख देवळात (श्रीप्रभूच्या वेळी येथे एका म्हातारीची खोपटी होती) त्या खोपटीतील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: तिवसा | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू भिष्णूरहून नमस्कारीला आले. तीन दिवस पावसाची झड चालू असल्यामुळे तिन्हीही दिवस त्यांचा येथेच मुक्काम झाला. त्यांनी येथे भक्तजनांच्या सोबत तुरीच्या मीठ टाकून उकडलेल्या शेंगा आरोगणा केल्या. (गो. प्र. च. २४२, स्था. पो.) तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर श्रीगोविंदप्रभू येथून आखतवाड्याला गेले.

जवळील इतर स्थाने