स्थान - T:तिरोडा D:गोंदिया
स्थान क्र. 2
चमत्कार
सुकळी (डाकराम)
सिंहनाद करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निद्रा स्थान देवळाच्या पूर्वेस आवाराच्या दरवाजाच्या आत दक्षिण बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू संध्याकाळच्या वेळेस निद्रा करण्यासाठी भीवेश्वराच्या देवळाकडे येत होते. त्या वेळी लोकांनी सांगितले, "आपण तिकडे जाऊ नका. तेथे वाघ आहे." सर्वज्ञ त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता देवळाकडे आले. आवाराच्या मुख्य दरवाजातून आत येताच देवळाच्या चौकात बसलेल्या वाघाने मोठ्याने गर्जना केली. तेव्हा सर्वज्ञांनीही सिंहासारखी गर्जना केली. त्यामुळे तो वाघ घाबरून आवाराच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. (ए. ली. १७, तु. प्र. स्था. पो.)