मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

वाघळी · चाळीसगाव · जळगाव

स्थान - T:चाळीसगाव D:जळगाव

स्थान क्र. 1 वसती वाघळी

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वाघळी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस १२ कि.मी. आहे व भडगावहून नैऋत्येस २४ कि.मी. आहे. सायगव्हाण ते वाघळी पायमार्गे २१ कि.मी. आहे व नागद, कजगाव मार्गे २६ कि.मी. आहे. वाघळीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरा मधील वाघळी हे रेल्वे स्थानक आहे. वाघळी रेल्वे स्थानक ते वाघळी गाव ६ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वाघळी गावाच्या पूर्व विभागी कृष्णपुरा विभागात पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: चाळीसगाव | Distt: जळगाव
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सायगव्हाणहून वाघळीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३८०, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून कनाशीला गेले.

जवळील इतर स्थाने