स्थान - T:जामनेर D:जळगाव
स्थान क्र. 1
अवस्थान
शेंदुर्णी
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शेंदुर्णी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर पाचोऱ्याहून पूर्वेस २६ कि.मी. आहे व पहूरहून नैऋत्येस १० कि.मी. आहे. पाचोरा-जामनेर लोहमार्गावरील शेंदुर्णी हे रेल्वे स्थानक आहे. शेंदुर्णी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. पाचोरा-शेंदुर्णी मार्गावर आंबेडगाव येथे पारिमांडल्य महानुभाव आश्रम आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शेंदुर्णी गावाच्या दक्षिण विभागी सोन नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गोपाळाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने प्रचलित आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पाचोऱ्याहून शेंदुर्णीला आले. त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते. (पू.ली. ४१०, स्था.पो. उ.प्र.) त्यानंतर ते येथून पिंपळगावला गेले. येथील इतर लीळा : (१) पद्मभानीने तयार केलेली हरभऱ्याची धिरडी आरोगण करणे. (पू.ली. ४११) (२) उपाध्ये व प्रसन्नायक यांना श्रीक्षेत्र रिद्धपूरला पाठविणे. (पू.ली. ४१५) (३) पद्मभानी पाठवणी (पू.ली. ४१२) (४) उपाध्या विष्णुभटा भेटी (पू.ली. ४१४)