स्थान - T:काटोल D:नागपुर
स्थान क्र. 1
विद्या स्वीकार
काटोल
वयस्तंभिनी विद्या स्वीकार स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
काटोल हे शहर, नागपूरहून वायव्येस ५७ कि. मी. आहे. मोर्शी ते काटोल (वरूद मार्गे) ७७ कि. मी. आहे. भिष्णूरहून तळेगाव, धर्ती मूर्ती मार्गे काटोलला जाता येते. काटोल हे दिल्ली-नागपूर लोहमार्गावरील रेल्वेस्थानक आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान काटोल शहराच्या पूर्व विभागी बुधवार पेठेत प्राथमिक शाळा क्रमांक ८ च्या पाठीमागे किल्ल्याच्या पश्चिम बाजूस पश्चिमाभिमुख देवळात आहे. (सर्वज्ञांच्या वेळी येथे उधळीनाथांचे निवासस्थान होते)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंनी एकांकामध्ये येथे द्वारावतीकारांचे शिष्य विद्यावंत उधळीनाथ यांच्यापासून वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार केला. (पू. ली. २५)