मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मनसर · रामटेक · नागपुर

स्थान - T:रामटेक D:नागपुर

स्थान क्र. 1 आसन/स्थिती मनसर

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मनसर हे गाव, हैदराबाद- दिल्ली या राष्ट्रीय महामार्गावर नागपूरहून ईशान्येस ४० कि. मी. आहे. काटोल ते मनसर (नागपूर मार्गे) ९७ कि. मी. आहे. काटोलहून सावनेर पारिशवनी मार्गेही मनसरला जाता येते. मनसर येथे तीर्थयात्रकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मनसर गावाच्या पूर्वेस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर रामटेक सडकेच्या उत्तरेस तळ्याच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. (सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते)

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: रामटेक | Distt: नागपुर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात रामटेकहून मनसरला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. भोगरामाच्या ओट्यावर बसल्याने ज्या ब्राह्मणास स्थिती झाली, तो ब्राह्मण रामटेकहून मनसरला सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आला. येथे त्याला सर्वज्ञांचे दर्शन झाले आणि सर्वज्ञांच्यापासून स्थितीही झाली. (ए. ली. १९ ख प्र. स्था. पो.)

जवळील इतर स्थाने