स्थान - T:मौदा D:नागपुर
स्थान क्र. 1
वास्तव्य/चमत्कार
मौदा
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मौदा हे गाव, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूरहून पूर्वेस ३८ कि. मी. आहे व भंडाऱ्याहून पश्चिमेस २४ कि. मी. आहे. मौदा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मौदा गावाच्या पश्चिमेस कन्हान नदीच्या पात्रात विस्तीर्ण खडकावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ४७) २) याच ठिकाणी भांडारेकर सर्वज्ञांना झोपण्यासाठी शयनासन रचत होते. त्या वेळी त्यांना इंगळीने दंश केला. त्यामुळे त्यांना असह्य पीडा होऊ लागली. भांडारेकरांनी सर्वज्ञांना विचारले, "मी आपली स्तुती करू?" आणि सर्वज्ञांची आज्ञा मिळताच त्यांनी स्तुती करण्यास प्रारंभ केला. जशी जशी स्तुती केली, तसे तसे इंगळीचे विष उतरू लागले आणि संपूर्ण विष हरण झाले. (पू. ली. ४७)