स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 1
पूजा/आरोगणा
गांधारी
प्रातः पूजा आरोगणा स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गांधारी हे गाव, पैठण-शहागड मार्गावरील गांधारी फाट्यापासून आग्नेयेस २ कि.मी. आहे. पैठण ते गांधारी फाटा ३८ कि.मी. शहागड ते गांधारी फाटा ३ कि.मी. डोमलगाव फाटा ते गांधारी फाटा ३ कि.मी. डोमलगाव ते गांधारी ६ कि.मी. डोमलगावहून आग्नेयेस गांधारी पायमार्गे ३ कि.मी. आहे. गांधारी फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गांधारी गावाच्या पूर्व विभागी मराठी शाळेजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शहागडहून गांधारीला आले. प्रथम त्यांनी घाण्यापाशी उभे राहून घाणा अवलोकन केला. मग त्यांना येथे आसन झाले. सकाळचा पूजावसर झाला. दहीकरंब्याची आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. नंतर सर्वज्ञांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर ते येथून डोमलगावला गेले. (पू.ली. ५२८, स्था.पो.)