स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 1
वसती
करडगाव
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जालना-अंबड सडकेवरील लालवाडी फाटा पेट्रोल पंपापासून (रणीउंचेगाव, पानेवाडी मार्गे ) करडगावला जाता येते. हे अंतर २५ कि.मी. आहे. जालना-मंडळ सडकेवरील विरंगाव फाट्याहून (कौठा, रांजणी मार्गे ) करडगावला जाता येते. ढाकेफळ ते करडगाव माहेरजवळा मार्गे १३ कि.मी. आहे. करडगाव, मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील रांजणी रेल्वेस्थानकापासून पश्चिमेस ५ कि.मी. आहे. जालना व परतूरमधील रांजणी हे रेल्वेस्थानक होय. करडगाव, येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान करडगावच्या पश्चिम विभागी जि.प. प्राथमिक मराठी शाळेजवळ दुधना नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गाढेसावरगावहून करडगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ५२३ ख.प्र. स्था.पो.को.शा.प्रत) दुसऱ्या दिवशी ते येथून अहिरमलला गेले. मंदिराच्या आग्नेयचे मांडलिक स्थान आहे