मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कनाशी · भडगाव · जळगाव

स्थान - T:भडगाव D:जळगाव

स्थान क्र. 1 आसन कनाशी

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कनाशी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावरील कजगावपासून उत्तरेस ६ कि.मी. आहे. १) वाघळी ते कजगाव ८ कि.मी. २) भडगाव ते कजगाव १६ कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरामधील कजगाव अथवा नगरदेवळा रेल्वेस्थानकांवर उतरून कनाशीला जाता येते. १) कजगाव रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. २) नगरदेवळा रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. कनाशीला जाण्यासाठी चाळीसगाव व भडगाव येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कनाशी गावाच्या दक्षिणेस ओळाच्या पलीकडे नांदणीच्या (बारवेच्या) आग्नेय काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: भडगाव | Distt: जळगाव
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वाघळीहून कनाशीला आले. प्रथम त्यांना येथे आसन झाले. (पू.ली. ३८१, स्था.पो.) येथील इतर लीळा : (१) दादोस, इंद्रभट, काकोस, सारंगपंडित, एल्हाइसा, आबाइसा, माहादाइसा, उमाइसा, गौराइसा, सामकोस, सोभागा या सर्वाची भेट येथे झाली. (पू.ली. ३८१) (२) एल्हाइसाचे 'साधा' नामकरण करणे. (पू.ली. ३८२) (३) सामकोसाचे 'मदळसा' नामकरण करणे. (पू.ली. ३८३) (४) इंद्रभटाते सुखस्वस्ति पुसणे. (पू.ली. ३८४) (५) ब्राह्मणा अभ्यार्थनी भृत्याते जेवू पाठविणे. (पू.ली. ३८५) (६) सर्वज्ञांना दुपारचा पूजावसर, आरोगणा, पहुड, उपहुड येथेच झाला. (पू.ली. ३८५, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने