स्थान - T:भडगाव D:जळगाव
स्थान क्र. 2
वसती
कनाशी
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कनाशी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावरील कजगावपासून उत्तरेस ६ कि.मी. आहे. १) वाघळी ते कजगाव ८ कि.मी. २) भडगाव ते कजगाव १६ कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरामधील कजगाव अथवा नगरदेवळा रेल्वेस्थानकांवर उतरून कनाशीला जाता येते. १) कजगाव रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. २) नगरदेवळा रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. कनाशीला जाण्यासाठी चाळीसगाव व भडगाव येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कनाशी गावाच्या दक्षिण विभागी गढीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. आवाराचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना नांदणीच्या काठावर आसन असताना सायंकाळच्या वेढेस गावातून एक ब्राह्मण आला. त्याने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी आणले. सर्वज्ञांच्या वेळी येथे त्या ब्राह्मणाचे घर होते. मर्दना मादने झाल्यावर सर्वज्ञांना या ठिकाणी आसन झाले. पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला व येथेच त्यांचा एक रात्र मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून भडगावला गेले. (पू.ली. ३८६, स्था.पो.)