स्थान - T:भडगाव D:जळगाव
स्थान क्र. 5
आसन
कनाशी
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कनाशी हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावरील कजगावपासून उत्तरेस ६ कि.मी. आहे. १) वाघळी ते कजगाव ८ कि.मी. २) भडगाव ते कजगाव १६ कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरामधील कजगाव अथवा नगरदेवळा रेल्वेस्थानकांवर उतरून कनाशीला जाता येते. १) कजगाव रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. २) नगरदेवळा रेल्वेस्थानक ते कनाशी ५ कि.मी. कनाशीला जाण्यासाठी चाळीसगाव व भडगाव येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या सभामंडपासमोर पश्चिमाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
ब्राह्मणाने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी आणल्यावर प्रथम त्यांना येथे बाज सुपवतीवर आसन झाले. ब्राह्मणाच्या पत्नीने तांब्याभर पाणी आणून सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू.ली. ३८६)