स्थान - T:भडगाव D:जळगाव
स्थान क्र. 1
अवस्थान
भडगाव
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भडगाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस ३६ कि.मी. आहे व पाचोऱ्याहून पश्चिमेस १४ कि.मी. आहे. कनाशीहून ईशान्येस भडगाव (कोठली मार्ग) ८ कि.मी. आहे. भडगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वसती होती.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कनाशीहून भडगावला आले. प्रथम गावाच्या ईशान्येस असलेल्या शिवालयात त्यांचे तीन दिवस अवस्थान झाले; परंतु तेथे फार रचमच असल्यामुळे फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या दिवशी ते येथे आले. त्यांचे या ठिकाणी सात दिवस वास्तव्य होते. (पू.ली. १८२, तू.प्र.स्था.पो.) येथील इतर लीळा : (१) इंद्रभटांना वसिनेक्षेपप्रसंगी भटाचार्यांची गोष्ट सांगणे. (पू.ली. ३९१) (२) नागदेवभटांचे 'इंद्रया' हे प्रासादिक नाव ठेवणे. (पू.ली. ३९४) (३) इंद्रभटांना तांबोळाचा प्रसाद देणे. (पू.ली. ३९६) (४) गौराइसाला पंचराणेच्या मुख्यनायक म्हणणे. (पू.ली. ३९७) (५) गौराइसा निद्राप्रसंगे इंद्रभटांना शिक्षापण करणे. (पू.ली. ३९८) (६) माहादाइसाच्या उपहाराचा व वस्त्राचा स्वीकार करणे. (पू.ली. ४००) (७) साधा पूजाकरणी, बाइसा कोपणे. (पू.ली. ४०१) (८) उमाइसाला द्वारकेला पाठविणे. (पू.ली. ४०३) (९) काकोसांना स्थिती देऊन द्वारका दर्शन करविणे. (पू.ली. ४०५) (१०) पद्यनाभीचे क्षौर निराकरणे. (पू.ली. ४०६) (११) साधा मोदक विपलाणे. (पू.ली. ४०७)