स्थान - T:भडगाव D:जळगाव
स्थान क्र. 2
अवस्थान/विहरण
भडगाव
अवस्थान आणि विहरण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भडगाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस ३६ कि.मी. आहे व पाचोऱ्याहून पश्चिमेस १४ कि.मी. आहे. कनाशीहून ईशान्येस भडगाव (कोठली मार्ग) ८ कि.मी. आहे. भडगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भडगावच्या ईशान्येस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर गिरणा नदीच्या उत्तर काठी पश्चिमाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सायंकाळच्या वेढेस कनाशीहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. ३८९, स्था.पो.) हे सर्वज्ञांचे विहरण स्थानही होय. (पू.ली. ३९३) येथील इतर लीळा : (१) अनंताचे सुड ऐकणे. (पू.ली. ३९३) (२) नागदेवभटांना स्थिती देणे. (पू.ली. ३९४)