स्थान - T:पाचोरा D:जळगाव
स्थान क्र. 1
वसती
पाचोरा
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पाचोरा हे गाव, मालेगाव-मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस ४९ कि.मी. आहे व जामनेरहून नैऋत्येस ५९ कि.मी. आहे. भडगाव ते पाचोरा १४ कि.मी. मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेमार्गावरील पाचोरा हे जंक्शन आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पाचोरा शहरातील जुन्या जामनेर रस्त्यावरील भारत बिल्डिंगच्या पाठीमागे हिवरा नदीच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भडगावहून पाचोऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४०९, स्था.पो.उ.प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून शेंदुर्णीला गेले.