मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चांगदेव · मुक्ताईनगर · जळगाव

स्थान - T:मुक्ताईनगर D:जळगाव

स्थान क्र. 2 चरणचारी चांगदेव

चरणचारी उभे राहणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांगदेव हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस ५ कि.मी. आहे. १) मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा ५ कि.मी. २) भुसावळ ते चांगदेव फाटा २७ कि.मी. शेंदुर्णीहून जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर मार्गे चांगदेवला जाता येते. चांगदेवला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या ओसाड चांगदेव गावात चांगदेव मंदिराच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे चांगदेव मंदिराच्या आवाराच्या दक्षिण दरवाजाची पूर्व सोंडी होती.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मुक्ताईनगर | Distt: जळगाव
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू, सकाळचा पूजावसर झाल्यानंतर विहरणाला जात असताना येथे सोंडीवर दक्षिणाभिमुख चरणचारी उभे होते. त्या वेळी कवि डिंभ रामदेव (चिंचखेडकर) नदीकडून गावातील बाजारपेठेतून आपल्या सर्व शिष्यांसहित येत होते. त्यांनी सर्वज्ञांना सोंडीवर उभे असल्याचे पाहिले आणि धावत पुढे आले. आपल्या हातातील रंगीत नक्षीदार काठी सर्वज्ञांना दिली. दंडवत घातले. ती काठी घेऊन सर्वज्ञ त्रीभंगी उभे राहिले. मग कवी डिंभाने एक गीत म्हटले. त्यानंतर सर्वज्ञ येथून विहरणासाठी गेले. (पू.ली. ४१८, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने