मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चांगदेव · मुक्ताईनगर · जळगाव

स्थान - T:मुक्ताईनगर D:जळगाव

स्थान क्र. 3 अवस्थान चांगदेव

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांगदेव हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस ५ कि.मी. आहे. १) मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा ५ कि.मी. २) भुसावळ ते चांगदेव फाटा २७ कि.मी. शेंदुर्णीहून जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर मार्गे चांगदेवला जाता येते. चांगदेवला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चांगदेव मंदिराच्या नैऋत्येस तापी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. स्थानाच्या उत्तर बाजूचे दोन्ही खांब नमस्कारी असल्याचे बोलले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे मठ होता. त्या मठातील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मुक्ताईनगर | Distt: जळगाव
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात टाकळीहून चांगदेवला आले. त्यांचे या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य होते. (पू.ली. ३४७ ख.प्र.स्था.पो.) त्यानंतर ते येथून दुधळेगव्हाणला गेले.

जवळील इतर स्थाने