मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

हरताळे · मुक्ताईनगर · जळगाव

स्थान - T:मुक्ताईनगर D:जळगाव

स्थान क्र. 1 आसन हरताळे

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हरताळे हे गाव, भुसावळ-मुक्ताईनगर मार्गावरील हरताळे फाट्यापासून दक्षिणेस २ कि.मी. आहे. १) मुक्ताईनगर ते हरताळे फाटा ५ कि.मी. २) भुसावळ ते हरताळे फाटा २७ कि.मी. ३) चांगदेव ते हरताळे ७ कि.मी. हरताळे येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान हरताळे गावाच्या पूर्वेस अंदाजे ४०२ मीटर अंतरावर तळ्याच्या ईशान्य काठी पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मुक्ताईनगर | Distt: जळगाव
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दुधळेगव्हाणहून हरताळ्याला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. (पू.ली. ४४० ख.प्र.) सर्वज्ञांनी येथून भारंबा डोंगराचे अवलोकन केले. (स्था. पो. खा. प्र.) त्यानंतर ते येथून टाकळीला गेले.

जवळील इतर स्थाने