मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

जोगलादेवी · घनसावंगी · जालना

स्थान - T:घनसावंगी D:जालना

स्थान क्र. 1 पूजा/आरोगणा जोगलादेवी

प्रातः पूजा आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जोगलादेवी हे गाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील जोगलादेवी फाट्यापासून ३ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते जोगलादेवी फाटा ४ कि.मी. साडेगाव ते जोगलादेवी फाटा ४ कि.मी. साडेगावहून ईशान्येस जोगलादेवी पायमार्ग ४ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जोगलादेवी गावाच्या नैऋत्येस गावालगतच बंधाऱ्याजवळ रस्त्याच्या पूर्वेस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे देवताभुवन होते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: घनसावंगी | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कार्तिक पौर्णिमेच्या पाडव्या दिवशी सकाळच्या वेढेस रामसगावहून जोगलादेवीला आले. येथे सकाळचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. मग सर्वज्ञांनी विश्रांती घेतली. दुपारच्या वेढेस सर्वज्ञ येथून साडेगावला गेले. (पू. ली. ५०४, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने