स्थान - T:घनसावंगी D:जालना
स्थान क्र. 1
अवस्थान
रामसगाव
राजमठी अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रामसगाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून ४ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा ३ कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा ५ कि.मी. जोगलादेवी ते रामसगाव ८ कि.मी. अंबड ते रामसगाव ३७ कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रामसगावच्या दक्षिणेस ६०० मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी टेकडीवर उत्तराभिमुख देवळात नैऋत्य विभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास 'नरसिंह' मठ असे नाव होते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात ढाकेफळहून रामसगावला आले. प्रथम संगमेश्वराच्या देवळात त्यांना आसन झाले. आबाइसाच्या गुंफेत वसती झाली. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथे आले. त्यांचे या ठिकाणी दहा दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून जोगलादेवीला गेले. (पू.ली. २७२ तू.प्र.स्था.पो.) येथील इतर लीळा : १) उमाइसाच्या उपहाराचा स्वीकार करणे. (पू.ली. ५०१) २) सोभागाच्या बहिणीचा उपहार स्वीकार करणे. (पू.ली. ५०३)