स्थान - T:घनसावंगी D:जालना
स्थान क्र. 5
व्यथाहरण
रामसगाव
काळस्फोट व्यथाहरण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रामसगाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून ४ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा ३ कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा ५ कि.मी. जोगलादेवी ते रामसगाव ८ कि.मी. अंबड ते रामसगाव ३७ कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान राजमठाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लळताइसाची गुंफा होती.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
लळताइसा, ही रामनाथाची पुजारीण. तिच्या पायाला काळस्फोट झाला होता. त्यामुळे तिला फार वेदना होत होत्या. सर्वज्ञांनी येथे येऊन तिची दु:खाची व्यथा हरण केली. (पू.ली. ५००, स्था.पो.)