स्थान - T:घनसावंगी D:जालना
स्थान क्र. 8
आसन
रामसगाव
वडाच्या झाडाखालील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रामसगाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून ४ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा ३ कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा ५ कि.मी. जोगलादेवी ते रामसगाव ८ कि.मी. अंबड ते रामसगाव ३७ कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तर दारवठा स्थानापासून उत्तरेस १४१ फूट अंतरावर ओळाच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञांनी येथे उमाइसाचे सांत्वन केले. (पू.ली. ४९७, स्था.पो.) येथील इतर लीळा : १) काळदासभटांतांबोळग्रहणी स्थिती (पू.ली. ४९८) २) वैजोबा भ्रींगी नामकरण (पू.ली. ४९९) ३) ओती उमाइसाशी आश्वासन (पू.ली. ४९७) ४) सौभागांची भेट (स्था.पो. उ.प्रत) ५) उमाइ दर्शना येणे (पू.ली. ५०२)