स्थान - T:घनसावंगी D:जालना
स्थान क्र. 9
आसन
रामसगाव
आसन स्थान (संगमेश्वर)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रामसगाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून ४ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा ३ कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा ५ कि.मी. जोगलादेवी ते रामसगाव ८ कि.मी. अंबड ते रामसगाव ३७ कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रामसगावच्या दक्षिणेस अंदाजे ४०२ मीटर व राजमठाच्या उत्तरेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर सिद्धनाथाच्या देवळाच्या आग्नेयेस उंचवट्यावर उत्तराभिमुख देवळात आग्नेय विभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे संगमेश्वराचे देऊळ होते. त्या देवळातील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढाकेफळहून रामसगावला आल्यावर प्रथम त्यांना येथे आसन झाले. या ठिकाणी आबाइसा व उमाइसा यांची भेट झाली. त्याप्रसंगी सर्वज्ञांनी तैल्यकर युग्मा स्थिती या एकांकातील लीळेचे कथन केले. (पू.ली. ४९३ स्था.पो.खा.द.शा.प्रत)