मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रामसगाव · घनसावंगी · जालना

स्थान - T:घनसावंगी D:जालना

स्थान क्र. 13 आसन रामसगाव

माणिकदंडी आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रामसगाव, तीर्थपुरी-साडेगाव मार्गावरील रामसगाव फाट्यापासून ४ कि.मी. आहे. तीर्थपुरी ते रामसगाव फाटा ३ कि.मी. साडेगाव ते रामसगाव फाटा ५ कि.मी. जोगलादेवी ते रामसगाव ८ कि.मी. अंबड ते रामसगाव ३७ कि.मी. रामसगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. जोगलादेवीहून किंचित आग्नेयेस रामसगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रामसगावपासून पूर्वेस २ कि.मी. अंतरावर कंडारी गावाकडे जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याच्या दक्षिणेस श्री. शिवाजी लक्ष्मणराव भोजने यांच्या शेतात हिवऱ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: घनसावंगी | Distt: जालना
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढाकेफळहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. बाइसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गुळळा (चूळ भरणे ) झाला. विडा झाला. (पू.ली. ४९१, स्था.पो) २) नाथोबा निर्गमनी बाइसाप्रति पडाळीए गाईचा दृष्टांत निरूपणे. (पू.ली. ४९०) ३) वाट्यात्मकांची व सर्वज्ञांची येथे भेट झाली. त्यांच्या विनंतीवरून सर्वज्ञ येथून रामसगावला गेले. (पू.ली. ४९२)

जवळील इतर स्थाने