श्रीदत्त मंदिर - T:सिन्नर D:नाशिक
स्थान क्र. 1
वस्ती
खोपडी
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
खोपडी हे गाव, सिन्नर-शिर्डी मार्गावर सिन्नरहून पूर्वेस १३ कि.मी. आहे व शिर्डीहून (सावळेविहीर फाटा, झगडा फाटा, देर्डे वावी मार्गे) ४७ कि.मी. आहे. नाशिक ते खोपडी ४२ कि.मी. बेलापूर ते खोपडी ९२ कि.मी. खोपडी येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. 'श्रीदत्त मंदिर' या नावाचा एस.टी. बस थांबा आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे व मंदिराच्या आग्नेयेस रस्त्याच्या पलीकडे महानुभाव आश्रमही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खोपडी गावाच्या पूर्वेस १ कि.मी. अंतरावर सिन्नर - शिर्डी मार्गाच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने प्रख्यात आहे.
श्रीदत्त मंदिर Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
श्रीदत्त मंदिर Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
श्रीदत्त मंदिर Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वावीहून खोपडीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सिन्नरला गेले. देवळाच्या नैऋत्य विभागीचे देवळाच्या ईशान्येचे पाऊन फर्लांंगावरचे पूर्वाभिमुख देवळातील स्थान व देवळाच्या पूर्वेचे एक फर्लांंगावरील सडकेच्या उत्तर बाजूचे पूर्वाभिमुख देवळातील स्थान , हे तिन्हीही स्थाने निर्देशरहीत आहेत .