स्थान - T:नाशिक D:नाशिक
स्थान क्र. 1
वस्ती
आडगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आडगाव, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून ईशान्येस १० कि.मी. आहे व ओझरहून नैऋत्येस १० कि.मी. आहे. आडगावला जाण्यासाठी नाशिकहून सिटी बस सेवा उपलब्ध आहे. आडगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आडगावच्या वायव्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर मुंबईआग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे. आज हे देऊळ श्रीदत्त मंदिर या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नाशिकहून आडगावला आले. देवळाच्या चौकात त्यांना आसन झाले. उपाध्ये व उपासनीय यांना पुढील गावास पाठविले. बाइसांनी संध्याकाळचा पूजावसर केला. उपहार तयार केला. सर्वज्ञांनी प्राशली केली. मग रात्रभर येथेच मुक्काम झाला. (पू. ली. २६५ ख. प्र., स्था. पो. उ. प्र.) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून सुकेण्याला गेले.