स्थान - T:नाशिक D:नाशिक
स्थान क्र. 1
वस्ती
अंजनेरी
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अंजनेरी हे गाव, नाशिक-त्र्यंबक मार्गावरील अंजनेरी फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. नाशिक ते अंजनेरी फाटा २२ कि.मी. त्र्यंबक ते अंजनेरी फाटा ७ कि.मी. अंजनेरीला जाण्यासाठी नाशिक व त्र्यंबकहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अंजनेरी गावाच्या पूर्वेस अंदाजे ३०१ मीटर अंतरावर पूर्वाभिमुख जैन मंदिरात आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गोवर्धनहून अंजनेरीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. नंतर सर्वज्ञ येथून त्र्यंबकला गेले. (पू. ली. २४९, स्था.पो.) व त्र्यंबकहून नाशिकला जाताना पुन्हा येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २५६, स्था. पो.)