स्थान - T:सिन्नर D:नाशिक
स्थान क्र. 1
अवस्थान
सिन्नर
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सिन्नर शहरातील 'राजा फत्तेसिंह' पथावर असलेल्या चौदा चौकाच्या वाड्यात उत्तराभिमुख हेमाडपंथी देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी या देवळास 'भीलमठ' असे नाव होते. स्थानाच्या पूर्व बाजूचे दोन खांब आणि देवळाच्या दारसंका व उंबरा नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खोपडीहून सिन्नरला आले. त्यांचे या ठिकाणी दहा महिने वास्तव्य होते. (पू.ली. २३६, स्था.पो.) येथील इतर लीळा : १) येथे सर्व भक्तजनांनी मिळून सर्वज्ञांच्या ठायी दवणा पर्व केले. मग सर्वजण खाली बसले. सर्वज्ञांच्यापासून सर्व भक्तजनांना स्थिती झाली. याच प्रसंगी सर्वज्ञांनी एल्हंभटांचे 'अवडळभट' असे नामकरण केले. (पू. ली. २४१, स्था. पो.) २) दायंबा जवळीक कथन (पू. ली. २४४)