मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सिन्नर · सिन्नर · नाशिक

स्थान - T:सिन्नर D:नाशिक

स्थान क्र. 2 भेटी सिन्नर

देवा, भटा, आबाइसा भेटी स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळापुढील पूर्वपश्चिम, उत्तराभिमुख दगडी पटीशाळेत दरवाजाच्या पूर्व बाजूस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: सिन्नर | Distt: नाशिक
दादोस, भटोबास, आबाइसा, माहादाइसा, उमाइसा, एल्हंभट हे सर्व भक्तजन रामसगावहून सिन्नरला सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंच्या दर्शनाला आले. येथे सर्वज्ञांची भेट झाली. त्यांनी पाने, सुपाच्या, पूजाद्रव्ये आसनावर ठेवली. दंडवत घातले. श्रीचरणा लागले. बाइसांनी सर्वज्ञांना विडा दिला. त्यानंतर तांबोळाचा प्रसाद सर्व भक्तजनांना दिला. त्या वेळी भटोबासांना स्थिती झाली. (पू. ली. २३९, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने