मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सिन्नर · सिन्नर · नाशिक

स्थान - T:सिन्नर D:नाशिक

स्थान क्र. 3 भेटी सिन्नर

माहादाइसा, उमाइसा भेटी स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवा , भटा , आबाइसा भेटी स्थानापासून पूर्वेस २ फूट १० इंच अंतरावर आहे .

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: सिन्नर | Distt: नाशिक
सर्व भक्तजण रामसगावहून सिन्नरला आल्यावर त्यांनी भीलमठाच्या शेजारीच राहण्यासाठी जागा घेतली . मग दादोस व भटोबास पाने , सुपाऱ्या , पूजाद्रव्ये आणण्यासाठी बाजारात गेले तेवढ्या वेळात महादाइसा आणि उमाइचा भिलमठाकडे आल्या . त्यावेळी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पटीशाळेवर येथे बसलेले होते. सर्वज्ञांची भेट झाली . आणि आसनावर सुपाऱ्या ठेवल्या . दंडवत घातले ही महादाइसा व उमाइसाची सर्वप्रथम भेट होय. ( पू. ली. २३८ ,स्था. पो.उ.प्रत )

जवळील इतर स्थाने