स्थान - T:सिन्नर D:नाशिक
स्थान क्र. 4
-
सिन्नर
गुजराथी वेष व गुजराथी भाषा बोलणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवा , भटा , आबाइसा भेटी स्थानापासून उत्तरेस ५ फूट ३ इंच अंतरावर आहे . या स्थानाच्या उत्तर बाजूचा खांब नमस्कारी आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
देवगिरीचा ' महादेव ' राजा मुंबई शहरातील माहिम विभागाकडे फिरतीसाठी गेला होता . तो येताना सिन्नरला आला . तेव्हा तेथे त्याला समजले की , वेरूळला जे पुरुष होते व ज्यांच्या दर्शनाची आपणाला उत्कट इच्छा होती , ते पुरुष येथे आहेत . राजाच्या मनात पुन्हा सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली . म्हणून त्याने पाल्हाडांगीयाला शोध घेण्यासाठी पाठविले, पाल्हाडांगीया सिन्नर मधील सर्व देवळे शोधीत शोधीत भीलमठाकडे आला . त्याला वाटले , हे लहान देऊळ आहे . बहुतेक ते पुरुष येथे नसतील म्हणून आपण आवाराच्या दरवाज्यापाशी उभा राहिला व सेवकाला आत पाहण्यास पाठविले . त्या वेळी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या पटीशाळेवर खांबाच्या आड गुजराथी वेष धारण करून उभे होते. सेवकाने विचारले, "येथे श्रीचांगदेवराऊळ गोसावी आहेत का?" सर्वज्ञ म्हणाले, "चांगदेवराऊळ नेणें ना बांगदेवराऊळ नेणें, भातारी एक छे, ते गांवामांही भिक्षा मागण गे छे, यौ सहौ छो." असे गुजराथी भाषेत उत्तर दिल्यावर ते येथून निघून गेले. (पू. ली. २३७, स्था. पो.)