स्थान - T:सिन्नर D:नाशिक
स्थान क्र. 6
बोळवीत राहावणे
सिन्नर
माहादाइसा बोळवीत राहावणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या ईशान्येस पश्चिमाभिमुख पडवीत आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
दादोस, भटोबास मुख्यकरून सर्व भक्तजन गावाकडे परत निघाले असताना सर्वज्ञ माहादाइसाला पोचवीत येथपर्यंत आले. त्यांनी माहादाइसाला सन्निधानी राहून दास्य करण्याविषयी सांगितले; पण माहादाइसा राहिल्या नाही. (पू. ली. २४६, स्था. पो.)