स्थान - T:सिन्नर D:नाशिक
स्थान क्र. 9
अवस्थान
सिन्नर
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिन्नर हे शहर, पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून उत्तरेस १८१ कि.मी. आहे व नाशिकहून आग्नेयेस २९ कि.मी. आहे. खोपडीहून पश्चिमेस सिन्नर १३ कि.मी. आहे. सिन्नरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सिन्नर शहराच्या दक्षिणेस पुणेनाशिक महामार्गाच्या पलीकडे शिव नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
भीलमठी दहा महिने अवस्थान झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. २४७ खप्रत) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे भीलमठी दहा महिने वास्तव्य झाल्यावर वैजनाथाच्या देवळी तीन दिवस वास्तव्य झाले. त्यानंतर पुन्हा भीलमठी एक रात्र मुक्काम झाला. एकूण दहा महिने चार दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून भगूरला गेले.