स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 1
वस्ती
सुकेणे
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सुकेणे हे गाव, ओझर-निफाड मार्गावर ओझरहून पूर्वेस ९ कि.मी. आहे व निफाडहून किंचित वायव्येस १५ कि.मी. आहे. (ओझर हे गाव, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून वायव्येस २० कि.मी. आहे.) आडगावहून सुकेणे ( सय्यदपिंप्री मार्गे) १५ कि.मी. आहे व ओझर मार्गे १९ कि.मी. आहे. मुंबई-भुसावळ लोहमार्गावरील नाशिक-मनमाड मधील सुकेणे हे रेल्वे स्थानक आहे. सुकेणे रेल्वे स्थानक ते सुकेणे गाव सव्वा कि.मी. आहे. सुकेणे येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मौजे सुकेणे गावामध्ये टेकावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने प्रख्यात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात आडगावहून सुकेण्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २६४, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून निफाडला गेले.