स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 1
आसन
शिवरे
शोध मार्गी पव्हे आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शिवरे हे गाव, निफाड-नांदूर मार्गावर निफाडहून आग्नेयेस ६ कि.मी. आहे. मार्गी आसन स्थानापासून आग्नेयेस दीड कि.मी. अंतरावर शिवरे येथील आसन स्थान आहे. शिवरे येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शिवरे गावाच्या पश्चिमेस अंदाजे ६०१ मीटर अंतरावर कादवा नदीच्या पूर्व काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू निफाडहून नांदूरला जात असताना त्यांना येथे आसन झाले. सकाळचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. मग त्यांनी विश्रांती घेतली. उठल्यावर गुळळा, विडा झाला. त्यानंतर सर्वज्ञ येथून नांदूरला गेले. (पू.ली. २६६, स्था.पो.)