स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 1
आसन
नांदूर (मध्यमेश्वर)
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नांदूर हे गाव, निफाडहून आग्नेयेस ११ कि.मी. आहे. शिवरेहून दक्षिणेस नांदूर ५ कि.मी. आहे. शिवरेच्या स्थानापासून दक्षिणेस नांदूर बंधारा ६ कि.मी. आहे. नांदूर येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नांदूर गावाच्या पश्चिमेस १ कि.मी. अंतरावर बंधाऱ्याजवळ गोदावरी नदीच्या दक्षिण काठी मध्यमेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात निफाडहून प्रथम येथे आले. त्यांना देवळाच्या चौकात आसन झाले. पूजा, आरोगणा झाली. पहुड, उपहुड झाला. सायंकाळच्या वेळेस सर्वज्ञ येथून नांदूर गावात गेले. (पू. ली. २७३ ख. प्र. स्था. पो.)