स्थान - T:निफाड D:नाशिक
स्थान क्र. 1
वस्ती
कानळस
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कानळस हे गाव, विंचूर-सावळेविहीर मार्गावरील कानळस फाट्यापासून पश्चिमेस ३ कि.मी. आहे. विंचूर ते कानळस फाटा २० कि.मी. कोळपेवाडी ते कानळस फाटा १३ कि.मी. नांदूर ते कानळस फाटा (विचूर मार्ग) ४० कि.मी. नांदूरहून आग्नेयेस कानळस (सारोळाथडी, खेडलेजुंगे, कोळगाव मार्ग) १६ कि.मी. आहे. कानळस फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कानळस गावाच्या नैऋत्येस गावालगतच बंधाऱ्याच्या जवळ गोदावरी नदीच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नांदूरहून कानळसला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २७१, स्था.पो.) देवळाच्या पाठीमागचे पायऱ्याचे स्थान व देवळाबाहेरील पश्चिम भिंती लगतचे स्थान हे दोन्हीही स्थान निर्देशरहित आहेत .