स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 1
आसन
साष्टीपिंपळगाव
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आपेगावहून ईशान्येस साष्टीपिंपळगाव २ कि.मी. आहे. साष्टीपिंपळगाव पैठण-शहागड मार्गावर पैठणहून आग्नेयेस ३२ कि.मी. आहे व शहागडहून वायव्येस ९ कि.मी. आहे. साष्टीपिंपळगाव जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आपेगावपासून ईशान्येस १ कि.मी. आणि पिंपळगावच्या पश्चिमेस एक कि.मी. अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहे. या ठिकाणी तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे, स्थानालगतच महानुभाव आश्रम आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात डोमलगावहून साष्टीपिंपळगाव आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. उपाध्यांना पाने आणण्यासाठी गावात पाठविले. ते येईपर्यंत सर्वज्ञ येथेच होते. (पू. ली. ५३०, स्था. पो.) त्यानंतर ते येथून आपेगावला गेले.