स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 1
अवस्थान/वस्ती
बळेगाव
अवस्थान आणि वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बळेगाव, पैठण-शहागड मार्गावरील बळेगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते बळेगाव फाटा २८.५ कि.मी. शहागड ते बळेगाव फाटा १२.५ कि.मी. हिरडपुरी स्थान ते बळेगाव ३ कि.मी. अंतर आहे. बळेगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बळेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. हिरडपुरी ते बळेगाव पायमार्गे २ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बळेगावच्या नैऋत्य विभागी गोदावरी नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस आपेगावहून (विज्ञानेश्वराचे) बळेगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते. (पू. ली. ५३४, स्था. पो.) व दुसऱ्या वेळेस पांचाळेश्वरहून बळेगावला आले. त्या वेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ५५३, स्था.पो.) येथील इतर लीळा : १) राणाइसाला वेशीला पाय लावण्यासाठी पाठविणे. (पू. ली. ५३७) २) जोमाइसाला नृत्य दीपनशक्ती देणे. (पू. ली. ५३९)