स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 2
आसन
बळेगाव
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बळेगाव, पैठण-शहागड मार्गावरील बळेगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते बळेगाव फाटा २८.५ कि.मी. शहागड ते बळेगाव फाटा १२.५ कि.मी. हिरडपुरी स्थान ते बळेगाव ३ कि.मी. अंतर आहे. बळेगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बळेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. हिरडपुरी ते बळेगाव पायमार्गे २ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या सभामंडपात उत्तर बाजूस आहे. गुंफेच्या परिसरातील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंनी बळेगावातील सोवासिनी स्त्रियांच्या ओवाळणीचा स्वीकार केला. (पू. ली. ५३४, स्था. पो.) २) ओवाळणीचा सोहळा झाल्यानंतर उपाध्ये व नाथोबा यांना राया मंडळिकांचा दृष्टांत देऊन समजावणे. (पू. ली. ५३५) ३) ओवाळणीचा सोहळा झाल्यावर लाखाइसाने सर्वज्ञांच्यासाठी उपहार आणला. मग सर्वज्ञांनी प्राशली केली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. (पू. ली. ५३६)